पाच वर्षांत ४०० कोटी खर्चुनही शहरात कचऱ्याचे ढीग

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी महानगरपालिकेने गेल्या पाच वर्षांत सुमारे ४०० कोटी रुपयांचा निधी खर्च केला आहे. मात्र, इतका मोठा खर्च करूनही शहरातील तीन कचरा प्रक्रिया प्रकल्पांवर अद्याप लाखो टन कचरा तसाच पडून असल्याचे समोर आले आहे. प्रशासनाच्या या ढिसाळ कारभाराची आणि खर्चाची सखोल
चौकशी करण्यात यावी, अशी मागणी महापालिकेतील एमआयएम पक्षाचे माजी विरोधी पक्षनेते समीर साजेद बिल्डर यांनी केली आहे.
पत्रकार परिषदेत समीर म्हणाले, राज्य शासनाच्या निधीतून महापालिकेने सुमारे २०० कोटी रुपये खर्च करून चिकलठाणा, पडेगाव व हसूल येथे कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू केले. शहरातून निघणाऱ्या ४५० टन कचऱ्यावर दररोज येथे
एमआयएमकडून चौकशीची मागणी
प्रक्रिया होणे अपेक्षित आहे. त्यासाठी मायो वेसल्स एजन्सीला महिन्याला २२ लाख रुपयांचे बील दिले जाते. त्यासोबतच नारेगाव, हसूल, चिकलठाणा व पडेगाव येथे काही वर्षांपासून पडून असलेल्या कचऱ्यावर बायोमायनिंग पद्धतीने प्रक्रिया करण्यासाठी जीएनआय कंपनीला
७२ कोटी रुपयांची निविदा देण्यात आली. आतापर्यंत या कंपनीला ४९ कोटी रुपयांचे बिल देण्यात आले. पण, संपूर्ण कचऱ्यावर अजून प्रक्रिया झालेली नाही. दरम्यान, घरोघरी जाऊन कचरा संकलन करणाऱ्या कंपनीला आतापर्यंत महिन्याला तीन ते साडेतीन कोटी रुपये बील दिले
जात होते. आता नव्या कंपनीला ८ ते ९ कोटी रुपये दिले जाणार आहेत. गेल्या पाच वर्षांत कचऱ्यावर सुमारे ४०० कोटी रुपये खर्च झाला असावा. तरीही कचऱ्याचे ढीग प्रक्रियेविना पडून आहेत. त्यामुळे यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असून, याची चौकशी करण्याची मागणी आयुक्त अमोल येडगे यांच्याकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी ओसामा कदीर मौलाना यांची उपस्थिती होती.